‘गन्स अँड गुलाब्स’मधल्या टिपूची होतेय चर्चा
राजकुमार राव हा नेहमीच वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी ओळखला जातो.
त्याने अभिनयाच्या बळावर स्वत:चं एक स्थान निर्माण केलं आहे.
लवकरच ‘गन्स अँड गुलाब्स’ या वेबसीरिजद्वारे तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
पाना टिपू ही भूमिका तो या वेबसीरिजमध्ये साकारणार आहे.
ही वेबसीरिज 18 ऑगस्टला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
राजकुमार रावला नव्या वेबसीरिजमध्ये नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
ट्रेंडिंग हॅशटॅगपासून फॅन-मेड मीम्सपर्यंत, सोशल मीडियावर ‘टिपू’ ची चर्चा सुरु आहे.
राजकुमारची ही नवी भूमिका चांगलीच गाजेल, यात शंका नाही.