योगी आदित्यनाथांच्या पाया पडल्यामुळे रजनीकांत ट्रोल
रजनीकांत यांच्या ‘जेलर’ सिनेमाची सध्या खूप चर्चा सुरु आहे.
अशातच रजनीकांत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली.
या भेटीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय.
या भेटीदरम्यान रजनीकांत यांनी केलेल्या एका कृत्यामुळे ते ट्रोल झाले आहेत.
रजनीकांत चक्क योगी आदित्यनाथ यांच्या पाया पडल्याने त्यांच्यावर टीका होतेय.
72 वर्षांचे रजनीकांत 51 वर्षांच्या योगी आदित्यनाथांच्या पाया पडतायत, ही बाब अनेकांना खटकली.
रजनीकांत यांनी स्वत:च आपली इमेज खराब केल्याची प्रतिक्रिया काहींनी दिली आहे.
तामिळनाडूसाठी ही शरमेची बाब असल्याचंही मत नेटकऱ्यांनी व्यक्त केलं आहे.