राखी सावंतचा रावण अवतार 

 ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमी भन्नाट लूकमुळे आणि विचित्र वक्तव्यामुळे चर्चेत असते.

दसऱ्याच्या निमित्ताने राखी सावंतने चक्क रावणाचा लूक केला होता.

दहा तोंडांचा मुखवटा, धनुष्य बाण, गदा आणि काळा ड्रेस अशा अवतारात तिने रावण साकारण्याचा प्रयत्न केला.

तिच्या या लूकवर एकाने कमेंट केली की, राखी आज खऱ्या रुपात समोर आली.

दुसऱ्या एकाने लिहिलं की, राखी तर चालता -फिरता राक्षस आहे.

राखीचा रावण लूक पाहून रावण आत्महत्या करेल, असंही काही जणांनी म्हटलं आहे.

राखीने रावणाच्या लूकमध्ये सगळ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राखीचे रावण अवतारातले फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.