रक्षाबंधनाला कोणत्या गोष्टी करु नये

Life style

31 JULY, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

रक्षाबंधन हा सण भावा-बहिणीमधील अतूट प्रेम, विश्वास आणि आदराचे प्रतीक आहे. यंदा 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे.

रक्षाबंधन 2025

रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते. भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते तर भाऊ आपल्या बहिणीला रक्षण करण्याचे वचन देतो.

रक्षाबंधनाच्या दिवशी काय होते

रक्षाबंधनाच्या दिवशी चुकूनही करु नका हे काम, जेणेकरून काहीही वाईट घडू नये. कोणत्या गोष्टी करु नये, जाणून घ्या

करु नका हे काम

मांसाहारी पदार्थ खाऊ नये

रक्षाबंधनाच्या दिवशी मांसाहारी पदार्थ खाऊ नये. यामुळे सणाचे पावित्र्य नष्ट होऊ शकते आणि भावा-बहिणींमधील नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.

भेटवस्तूंसाठी लोभ करु नये

रक्षाबंधनाच्या दिवशी भेटवस्तूंसाठी लोभ करु नका. या दिवशी भेटवस्तू देण्याची परंपरा आहे.

तक्रारी करु नका

रक्षाबंधनाच्या दिवशी जुने वाद, चुका किंवा तक्रारी विसरल्या पाहिजेत. जुने मुद्दे उकरून काढल्याने पुन्हा नात्यात दरी निर्माण होऊ शकते. 

 प्रामाणिकपणे साजरे करा

भाऊ आणि बहिणीचे नाते अनमोल असते. हे नेहमी लक्षात ठेवा. अशावेळी रक्षाबंधन प्रामाणिकपणे साजरे करा

भेदभाव करू नका

रक्षाबंधनाच्या दिवशी आई वडील, वृद्धांनी मुलांशी कोणत्याही प्रकारे भेदभाव करू नये. सर्वांना समान वागणूक दिली पाहिजे.