श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. यावेळी रक्षाबंधन शनिवार, 9 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे.
रक्षाबंधनाचा सण भाऊ बहिणीला समर्पित आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते.
यासोबतच ती तिच्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी, सुरक्षिततेसाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना करते
राखी बांधल्यानंतर भाऊ आपल्या बहिणीला संरक्षण आणि सहकार्याचे वचन देतो.
यावेळी भद्रा काळ नसल्याने राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त बराच काळ राहील.
रात्री राखी बांधावी की नाही. राखी सूर्योदयानंतर किंवा रात्री बांधू नये, असे म्हटले जाते
ज्योतिषशास्त्रानुसार राखी बांधण्याचा संबंध सकाळ, दुपार किंवा रात्री यांच्याशी नाही आहे.
राखी बांधताना भद्रा काळाकडे लक्ष द्यावे. कारण हा काळ खूप अशुभ मानला जातो
बहिणींनी नेहमी शुभ मुहूर्त पाहून राखी बांधावी. असे करणे फायदेशीर असते.