रक्षाबंधनाला भावाला कोणती राखी बांधावी

Life style

01 August, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

रक्षाबंधनाचा सण खूप पवित्र मानला जातो. हा बहीण भावाच्या नाताच्या अतूट प्रेमाचा सण आहे. यंदा हा सण 9 ऑगस्ट रोजी आहे.

रक्षाबंधन 2025

आता बाजारामध्ये विविध प्रकारच्या राखी उपलब्ध झालेल्या आहेत.

बाजारात विविध प्रकारच्या राखी

जर भावाला राखी म्हणून ब्रेंसलेट बांधत असाल तर ते धार्मिकदृष्ट्या अशुभ आहे. 

राखी म्हणून ब्रेंसलेट बांधणे

शुभ राख्या

कोणत्या प्रकारच्या राख्या बांधणे शुभ मानले जाते ते जाणून घेऊया

पिवळ्या रंगाची राखी

रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला पिवळ्या किंवा लाल रंगांची राखी बांधणे शुभ मानले जाते. त्यामुळे तुमच्या जीवनात आनंद येईल असे म्हटले जाते.

त्रिशूळ असलेली राखी

जर तुम्ही भावाला त्रिशूळ, स्वस्तिक, ओम असलेली राखी बांधली तर ते धार्मिकदृष्ट्या शुभ मानले जाते. त्यामुळे घरामध्ये सकारात्मकता येते.

रुद्राक्ष असलेली राखी

भावाच्या जीवनात प्रगती होताना पाहायची असेल तर रुद्राक्ष असलेली राखी बांधणे खूप शुभ मानले जाते. 

राखी बांधण्याचा मंत्र

राखी बांधतेवेळी बहिणींनी येन बद्धो बली राजा, दानवेन्द्रो महाबल। तेन त्वाम् बध्नामि, रक्षे माचल माचल या मंत्रांचा जप करावा.