30 आणि 31 ऑगस्टला रक्षाबंधन सेलिब्रेट करण्यात येणार आहे. यावेळी रक्षाबंधनाला भद्राची सावली पडत आहे.

श्रावण शुक्ल पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो.

या दिवशी बहिणी भावाच्या मनगटावर राखी बांधून आपल्या भावांकडून संरक्षणाचे वचन घेतात.

30 ऑगस्ट रोजी भद्राची सावली राहील. त्यामुळे 31 ऑगस्टला सकाळीच राखी बांधावी.

चला जाणून घेऊया या रक्षाबंधनाच्या दिवशी कोणते उपाय करावेत.

रक्षाबंधनाच्या दिवशी लक्ष्मीला लाल किंवा गुलाबी राखी अर्पण केल्याने आर्थिक समस्या दूर होतात

रक्षाबंधनाच्या दिवशी गणपतीला राखी बांधणे शुभ मानले जाते. बहिण-भावातलं प्रेम वाढतं.

तुरटी डोक्यावरून विरुद्ध दिशेने सात वेळा ओवाळून फेकून द्या.नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल.

 एक नारळ लाल मातीच्या भांड्यात ठेवा आणि पाण्यात वाहू द्या. या उपायाने पैशाची समस्या दूर होईल.