बऱ्याच चर्चांनंतर अखेर रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी विवाह बंधनात अडकलेत.

जॅकी आणि रकुलचे गोव्यात शाही लग्न झाले यावेळी जवळचे नातेवाईक उपस्थित होते.

नुकतेच त्यांनी सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केले.

रकुलने पेस्टल रंगाचा लेहेंगा घातला आहे, तर जॅकीने आयव्हरी रंगाची शेरवानी घातली.

दोघही फोटोमध्ये खूप सुंदर दिसत आहेत.

जॅकी आणि रकुल खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते.

चाहत्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केलेला आहे.

रकुल आणि जॅकीची केमिस्ट्री पाहून चाहतेही खुश आहेत.