अयोध्येत राम मंदिर उभारणीचे काम जोरात सुरू आहे. 1 जानेवारी 2024 रोजी राम मंदिराचे उद्घाटन होणार असल्याचे मानले जात आहे.

राम मंदिराच्या बांधकामाचे काही नवीन फोटो समोर आले आहेत. 

 राम मंदिराच्या ग्राउंड फ्लोअरचे काम पूर्ण झालेले आहे. 

राम मंदिर ट्रस्टने ऑक्टोबर महिन्यापर्यंत तळमजल्याचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते.

 22 एप्रिल रोजी ट्रस्टकडून नवे फोटो शेअर करण्यात आले होते.

या फोटोंमधून राम मंदिर आकारास येत असल्याची माहिती देण्यात आली होती. 

तीन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमीपूजन करून मंदिराची पायाभरणी केली होती. 

31 डिसेंबर 2023 पर्यंत मंदिराच्या खिडक्या, दरवाजे आणि मजल्यांसह काम पूर्ण होईल असे सांगण्यात येत आहे.