रमा राघवचं दिवाळी स्पेशल फोटोशूट

कलर्स मराठीवरील ‘रमा राघव’ ही अनेकांची आवडती मालिका आहे.

मालिकेत अभिनेत्री ऐश्वर्या शेटे ही रमाचं तर निखिल दामले राघवचं पात्र साकारत आहे.

या दोघांची जोडी नेहमीच खूप क्यूट दिसते.

नुकतंच या दोघांनी दिवाळीनिमित्त खास फोटोशूट केलं आहे.

या फोटोंच्या माध्यमातून दोघांनी प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हातात पणती धरून ट्रॅडिशनल लूकमध्ये त्यांनी हे फोटो काढले आहेत.

मालिकेत रमा आणि राघव या दोघांचेही स्वभाव खूप भिन्न आहेत.

मात्र आता त्यांचं नातं छान बहरताना दिसत आहे.