कलर्स मराठीवरची ‘रमा राघव’ ही अनेकांची आवडती मालिका आहे.
रमा राघवची जोडी खूप क्यूट दिसते.
मालिकेत ऐश्वर्या शेटेने रमाचं आणि निखिल दामलेने राघवचं पात्र साकारलं आहे.
‘रमा राघव’ मालिकेत आता एक मोठा बदल बघायला मिळणार आहे.
रमाचा मेकओव्हर झाला आहे.
देवीच्या पालखी उत्सवासाठी रमा सजलीआहे.
नेहमी फॉर्मल आणि बोल्ड कपड्यांमध्ये वावरणारी रमा पारंपरिक लूकमध्ये दिसतेय.
रमाच्या या ट्रॅडिशनल लूकमधले फोटो व्हायरल झाले आहेत.
साडीमध्ये रमाचं सौंदर्य खुलून आलं आहे. तिला मेकओव्हर सूट झालाय.