अयप्पा दीक्षा पूर्ण केल्यानंतर रामचरणने घेतलं सिद्धीविनायकाचं दर्शन
अभिनेता राम चरण सध्या मुंबईत आहे.
रामचरणने नुकतंच सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं.
रामचरणने नुकतंच अयप्पा दीक्षेचं व्रत पूर्ण केलं.
अयप्पा दीक्षा पूर्ण झाल्याबद्दल त्याने सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं.
अयप्पा दीक्षेच्या काळात काळे कपडे घालणं, अनवाणी चालणं, जमिनीवर झोपणं आणि खाण्याचे काही नियम 41 दिवस पाळावे लागतात.
अयप्पा दीक्षेमुळेच रामचरण काळा ड्रेस घालून सिद्धीविनायक मंदिरात आला होता.
रामचरणची गणपतीवर खूप श्रद्धा आहे.
रामचरणच्या घरीदेखील उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो.
वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर आगामी काळात रामचरण ‘गेम चेंजर’ चित्रपटामध्ये दिसणार आहे.