रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा अयोध्येतील राम मंदिरात झालेली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गर्भगृहात राम लल्लाची पूजा केली आणि त्यानंतर मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली.
प्राणप्रतिष्ठेनंतर रामलल्लाचे हे सुंदर फोटो समोर आले आहेत.
रामलल्लाचे हे सुंदर रुप पाहून प्रत्येकजण भावूक झालेला आहे.
राम लल्लाच्या कपाळावरील टिळ्याने लक्ष वेधले आहे, जे सुंदर आणि वेगळए आहे.
हा टिळा, खास रत्न, आणि मोत्यापासून तयार करण्यात आलाय.
रामलल्लाच्या धनुष्यबाणाबद्दल सांगायचे तर ते सोन्याचे आहे.
श्री रामाला पिवळ्या रंगाचे वस्त्र घालण्यात आले आहे.
दागिने सोने, रत्न, आणि रुबीचे आहेत. रामलल्लाची मूर्ती या दागिन्यांमुळे आकर्षित दिसत आहे.