मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये 141 व्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) सत्राचे उद्घाटन झाले.

या इव्हेंटमध्ये आलिया भट्ट पती रणबीर कपूरसोबत आली होती. दीपिका पदुकोण आणि शाहरुख खानही उपस्थत होते.

या बॉलिवूड स्टार्सचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

फोटोत दीपिका-शाहरुख समोर, तर त्यांच्या मागे रणबीर-आलिया दिसत आहेत.

व्हायरल फोटोमध्ये आलिया भट्टने खुर्चीवर डोके मागे टेकवलेले आहे, डोळेही बंद आहेत.

तर रणबीर कपूर त्याच्या फोनमध्ये बिझी आहे. त्यामुळे हे कपल ट्रोल होत आहे.

एका युजरने लिहिले आहे, 'या इव्हेंटमध्ये दोघांनाही रस नाही असंच वाटतंय.'

दुसऱ्या युजरने म्हटलंय, 'आलिया नेहमीच स्वतःमध्ये हरवलेली असते.'

इव्हेंटमध्ये आलिया जरदोसी एम्ब्रॉयडरी असलेल्या निळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसली.

दरम्यान, रणबीर पत्नी आलियासोबत निळ्या रंगाच्या इंडो-वेस्टर्नमध्ये लूकमध्ये दिसला.