अभिनेता रणदीप हुड्डाने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटासाठी 26 किलो वजन कमी केलं.
रणदीपने वजन कमी करण्यासाठी फक्त दूध आणि खजूर इतकाच आहार घेतला होता का?
शूटिंग संपेपर्यंत चार महिने रणदीप फक्त एक खजूर आणि एक ग्लास दूध प्यायचा, असा दावा चित्रपट निर्माते आनंद पंडित यांनी केला होता.
मात्र रणदीप हुड्डाने आपण फक्त दूध आणि खजूर एवढ्याच डाएटवर वजन कमी केल्याचा दावा खोडला आहे.
मात्र मी वीर सावरकरांच्या भूमिकेसाठी 26 किलो वजन कमी केलं हे खरं आहे,असं तो म्हणाला.
माझा चित्रपट तीन-चार महिन्यांत तयार व्हायला हवा होता, तो बनायला एक वर्षाहून अधिक कालावधी लागल्याचं त्याने सांगितलं.
माझी बहीण डॉ. अंजली हुड्डा इंटर्नल मेडिसीन स्पेशालिस्ट आहे. ती मला डाएटबद्दल सल्ला देत असते,असं तो म्हणाला.
खजूर आणि दुधाने वजन कमी होतं, अशा चुकीच्या बातम्या पसरवल्या जात होत्या, असं तो म्हणाला.
अशा डाएटचा सल्ला मी कुणालाही देणार नाही, असं त्याने सांगितलंय.