पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाझियाबादमध्ये रॅपिड-एक्स रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. नमो-भारत असं या ट्रेनचं नामकरण करण्यात आलं आहे.
ट्रेनच्या उद्घाटनाच्या वेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते. उद्घाटनानंतर नरेंद्र मोदींनी रेल्वेने प्रवास केला.
ही ट्रेन साहिबाबाद, गाजियाबाद, गुलधर, दुहाई आणि दुहाई-डिपो या पाच स्टेशनमधलं 17 किलोमीटरचं अंतर पार करणार आहे.
या ट्रेनची खासियत म्हणजे ही ट्रेन 180 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावणार आहे.
ही ट्रेन देशातील सेमी हायस्पीड ट्रेन वंदे भारतच्या स्पीडला टक्कर देणारी आहे. रॅपिडएक्समध्ये सेफ्टीची जबाबदारी आर्टिफिशल इंटेलिजन्सवर असेल.
या ट्रेनमध्ये एक डबा महिलांसाठी राखीव असेल. तसेच दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीही जागा राखीव असतील. या ट्रेनमध्ये साधारण 1700 लोक एका वेळी प्रवास करु शकतात.
या ट्रेनमधल्या प्रीमियम कोचमध्ये रिक्लायनिंग सिट्स, कोट हूक, मॅगझीन होल्डर आणि फुट रेस्टचीही सोय करण्यात आली आहे.
सीसीटीव्ही कॅमेरा एमर्जन्सी डोअर, चार्जिंग पॉइंट, कोच अटेंडंट अशा अनेक सुविधा या ट्रेनमध्ये आहेत.