आरबीआयकडून आज पतधोरण जाहीर करण्यात आले. सलग दुसऱ्यांदा व्याजदरात कोणतेही बदल केले नाहीत
रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला नसल्यामुळं गृहकर्जाच्या ईएमआयमध्ये वाढ झाली नाही
भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत असून महागाई दरात घट झाली असं आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणालेत
RBI च्या अंदाजानुसार, आर्थिक वर्ष 2023-24 (FY24) मध्ये महागाई 4% च्या वर राहण्याची शक्यता आहे
एप्रिल महिन्यातील महागाई दर 4.7 टक्के जो मागील वर्षातला सर्वात कमी गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले
आरबीआयने गुरुवारी रेपो दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच, व्याजदर 6.50% वर राहील.
आरबीआयने सलग दुसऱ्यांदा दर बदललेले नाहीत
RBI ने मे 2022 ते फेब्रुवारी 2023 पर्यंत दर 2.50% ने वाढवले आहेत