मधुमेहाचं प्रमाण आजकाल वाढतंय. लहान मुलांनाही मधुमेहाचा आजार होतोय.

गेल्या काही वर्षात 10 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये मधुमेहाच्या रुग्णांमध्ये 52.06 टक्के वाढ झाली आहे.

एक ते चार वर्षे वयोगटातील मुलांमध्ये मधुमेहाच्या रुग्णांमध्ये 30.52 टक्के वाढ झाली आहे.

मुलांमध्ये मधुमेह वाढण्याची वेगवेगळी कारणं आहेत.

बदलत्या जीवनशैलीमुळे मुलांच्या शारिरीक हालचाली कमी झाल्या आहेत.

मुलं खूप जास्त प्रमाणात गोड पदार्थांचं सेवन करतात.

जास्त कॅलरीयुक्त स्नॅक्स मुलं खातात त्यामुळे वजन वाढून टाइप 2 डायबिटीस होण्याचा धोका वाढतो.

काही वेळा अनुवांशिकतेमुळे मुलांना मधुमेह होतो.

मधुमेहाबद्दल जागरुकता नसल्याने अनेकदा या आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष होतं आणि त्रास वाढतो.