आंघोळीच्या साबणाच्या उरलेल्या छोट्या तुकड्यांचा असा करा वापर

आंघोळीचा साबण वापरल्यानंतर शेवटी त्याचा छोटा तुकडा शिल्लक राहतो.

या साबणाच्या उरलेल्या तुकड्यांचा तुम्ही पुन्हा वापर करू शकता. त्यासाठी काही सोपे मार्ग आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आंघोळीच्या उरलेल्या साबणाचे 10 -12 तुकडे जमा झाल्यावर ते कुस्करून घ्या. त्यानंतर पाण्यात टाकून ते विरघळू द्या. 

सुगंधासाठी त्या साबणाच्या पाण्यात सुगंधी तेल देखील घालू शकता. हा स्प्रे बाटलीत टाकून हात धुण्यासाठी वापरा.

साबणाचा तुकडा पातळ कापडात गुंडाळा आणि रात्रभर शूजमध्ये ठेवा. यामुळे सकाळी शूजमधील वास कमी होईल.

आंघोळीच्या साबणाच्या उरलेल्या तुकड्यांपासून कीटकनाशक तयार करू शकता. या तुकड्यांचे लिक्विड तयार करा. त्यात व्हेजिटेबल तेल घाला मग बागेत शिंपडण्यासाठी किटकनाशक तयार.

पावसाळ्यात कपड्यांमधून ओलसर, कुबट वास येतो. अशावेळी कपडे फ्रेश ठेवण्यासाठी आंघोळीच्या साबणाचे उरलेले तुकडे सुती कापडात गुंडाळून कपाटाच्या  रॅकवर ठेवू शकता.

शेव्हिंग क्रीमला पर्याय म्हणूनही उरलेल्या साबणाच्या तुकड्यांचा वापर करता येईल.