विश्वासाशिवाय एकमेकांशी उघडपणे आणि प्रामाणिकपणे बोलणे कठीण होऊ शकते.
आपलं सिक्रेट उघड झाल्यास जोडीदाराला राग येऊ शकतो. त्यामुळे नात्यात कटुता, राग आणि निराशा येऊ शकते.
एखाद्या जोडीदाराने काही महत्त्वाच्या गोष्ट लपवून ठेवल्यास, दोघांच्या त्यांच्या गरजा आणि इच्छा व्यक्त करणे कठीण होऊ शकते
.
जेव्हा कोणा एका जोडीदाराची गरज किंवा इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा नाते कमकुवत होऊ लागते.
सिक्रेट्स नात्यात अडथळा आणू शकतात. त्यामुळे कम्युनिकेशन गॅप नात्यात येऊ शकते.
सिक्रेट्स ठेवल्याने नात्यात तणाव आणि गैरसमज निर्माण होऊ शकतात.
जोडीदारापासून गोष्टी सिक्रेट्स ठेवल्यास भावनिक उलथापालथ होऊ शकते.
एखाद्या रहस्यामुळे तुमच्या दोघांमध्ये इतकं अंतर निर्माण होईल की विभक्त होण्याचा विचारही तुमच्या मनात डोकावू शकतो.