नात्यात चढ-उतार येणे हे स्वाभाविक आहे, मग ते नातं कोणतही असो, अगदी नवरा-बायकोचं नातही त्याला अपवाद नाही.
कधी कधी भांडणं इतकी टोकाला जातात की मग दोघंही वेगळं होण्याचा निर्णय
घेतात.
अशावेळी काही चूका टाळून आपण भांडण किंवा त्यामुळे होणारा परिणाम कमी करू शकतो
भांडणानंतर एकमेकांशी न बोलणं हे चुकीचं आहे. तसे केल्याने समस्या सुटत नाही.
भांडण झाल्यानंतरही एकमेकांशी बोलावे. चूक कोणाचीही असली तरी माफी मागावी
आपल्या भांडणाबद्दल सोशल मीडियावर काहीही लिहू नका.
यामुळे तुमच्या भांडणाचा फायदा तिसरी व्यक्ती उचलू शकते. तुमचं वैयक्तिक आयुष्य सार्वजनिक करू नका.
भांडण झाल्यावर ते वाढू नये म्हणून सोडवलं जात नाही. मात्र हे अत्यंत चुकीचे आहे.
भांडण झालेला मुद्दा सोडवणं अतिशय गरजेचं आहे. healthy नात्यासाठी ते अत्यंत आवश्यक आहे
.