तांदळाचे पाणी म्हणजे आरोग्यासाठी संजीवनी

तांदूळ शिजवल्यानंतर किंवा भिजवल्यानंतर उरलेलं पाणी आपण फेकून देतो. मात्र तांदळाच्या पाण्याचे अनेक फायदे आहेत. 

 तांदळाच्या पाण्याचे फायदे आपण जाणून घेऊयात.

तांदळाच्या पाण्यामध्ये व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई असते. त्यामुळे हे प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते. तसेच शरीराचा थकवा बर्‍याच प्रमाणात दूर होतो.

तांदळाचे पाणी त्वचेसाठी फायदेशीर असते. यामुळे अल्ट्रा व्हायलेट किरणांचा प्रभाव आणि संसर्ग कमी होतो.

शिजवलेल्या तांदळाचे पाणी चेहऱ्यावर लावा. यातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मामुळे चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स निघून जातात.

तांदळाचे पाणी केसगळती तसेच पांढऱ्या केसांची समस्यादेखील कमी करू शकते. यासाठी हे पाणी टाळूवर 15 ते 20 मिनिटे लावून ठेवा. नंतर सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुवा.

तांदळाच्या पाण्याच्या सेवनाने कर्करोगासारख्या आजारांचा धोका कमी होतो.यामध्ये फायबर असतं.हे पचनक्रिया सुधारण्यासाठीही चांगलं आहे.

शिजवलेल्या तांदळाचे पाणी प्यायल्याने रक्ताभिसरण व्यवस्थित होतं. त्यामुळे शरीरातील अनेक समस्या दूर होतात.