तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्यात खनिजे टिकून राहतात.

आरोग्यासाठी तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे केव्हाही फायदेशीर असते. 

तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती आहे का?

तांब्याचे भांडे शुद्ध असावे, भेसळयुक्त तांबं नाही ना हे तपासून घ्या. 

तांब्याची भांडी लिंबू आणि पाण्याने स्वच्छ करा. भांडं काळं पडत असल्यास रोज स्वच्छ करा. 

तांब्याच्या भांड्यात साबण कधीही ठेवू नका. भांडी साबण शोषून घेतील, त्याचा आरोग्यावरही परिणाम होईल.

रात्री झोपण्यापूर्वी तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवा, मग सकाळी त्याचे पाणी प्या.

तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्याने अन्न शिजवू नका. त्यामुळे चवीत फरक पडू शकतो.