अभिनेत्री रिंकू राजगुरू सोशल मीडियावर सक्रीय असते
रिंकू तिचे वेगवेगळ्या लूक्समधील फोटो, हटके फोटोशूट इंस्टा अकाऊंटवर शेअर करते.
रिंकूच्या पोस्टवर नेहमीच लाइक्सचा वर्षाव होत असतो, चाहते कमेंट्ससुद्धा करतात.
नुकतेच रिंकूने केदारनाथ येथील तिचे फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये ती केदारनाथ मंदिराच्या बाहेर उभी असलेली दिसत आहे.
रिंकूने सोशल मीडियावरील तिच्या सगळ्या पोस्ट डिलीट केल्याने ती चर्चेत आली होती.
केदारनाथ इथला फोटो शेअर करत 'हर हर महादेव' असं कॅप्शन रिंकूने दिलं आहे.
काही दिवसांपूर्वी तिने तिच्या ट्रेकचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते.
सैराट सिनेमाने रिंकूला रातोरात स्टार केले, तिच्या आगामी सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.