लालू प्रसाद यादव झाले 76 वर्षांचे, साधेपणाने साजरा केलाय Birthday

बिहारच्या राजकारणाचे प्रमुख आणि आरजेडी सुप्रिमो लालू प्रसाद यादव यांचा आज वाढदिवस आहे. संपूर्ण कुटुंबासोबत त्यांनी वाढदिवस साजरा केला.

लालू 76 वर्षांचे झाले आहेत. कुटुंबासोबत वाढदिवस साजरा करतानाचे काही फोटो समोर आले आहेत.

या फोटोंमध्ये ते पत्नी राबडी देवी, मुलगा तेजस्वी यादव आणि मुलींसोबत दिसत आहेत. त्यांची नातवंडेही फोटोत दिसत आहेत.

लालूंचा मुलगा आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही ट्विटद्वारे वाढदिवसाचे काही फोटो शेअर केले आहेत.

लालू प्रसाद यादव यांचा जन्म 11 जून 1948 रोजी बिहारच्या गोपालगंजमध्ये झाला होता. ते बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि भारताचे रेल्वे मंत्री राहिले आहेत.

यावेळी लालूंचा वाढदिवस खास बनवण्यासाठी राष्ट्रीय जनता दलानेही विशेष तयारी केली आहे. प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांच्या सूचनेवरून पक्षाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.

वडील लालू यादव यांना वाढदिवसानिमित्त मोठा मुलगा तेज प्रतापने व्हिडिओ कॉलद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

त्याचवेळी त्यांची मुलगी रोहिणी सिंगापूरहून पाटण्याला पोहोचली आहे. 'मी इथे माझ्या चारही धामांना भेट देण्यासाठी आले आहे', असे ती म्हणाली.