'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमाचे नवीन फोटो व्हायरल झाले आहेत.
हे फोटो पाहिल्यास सिनेमाच्या कथेचा अंदाज तुम्हाला बांधता येईल.
एका फोटोत शबाना आझमी यांच्या हातात लाल मफलर आहे. दुसऱ्या फोटोमध्ये धर्मेंद्रच्या हातातही असाच लाल मफलर दिसत आहे.
सिनेमात धर्मेंद्र रणवीर सिंगच्या आजोबांच्या भूमिकेत तर शबाना आलिया भट्टच्या आजीच्या भूमिकेत आहे.
नवीन फोटोंमध्ये जया बच्चनही दिसत आहेत. जया धर्मेंद्रच्या पत्नीच्या आणि रणवीरच्या आजीच्या भूमिकेत आहे.
रणवीर, आलियाचा नवा लूक, रोमॅण्टिक स्टाईल दिसत आहे.
या फोटोंमध्ये धर्मेंद्र आणि रणवीर एकत्र दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वीच 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चा टीझर रिलीज झाला आहे.
28 जुलैला हा सिनेमा रिलीज होणार आहे. करण जोहर दिग्दर्शक म्हणून पुनरागमन करत आहे.