Royal Enfieldच्या बाइक्सची जुलैमध्ये विक्री किती? Classic 350 ने केली कमाल!

Automobile

19 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

जुलै 2026 मध्ये कंपनीने एकूण 1,18,232 मोटरसायकल्सची विक्री केली. गेल्या वर्षीच्या 88,045 युनिट्सच्या तुलनेत सुमारे 34% वाढ झाली.

कंपनीची एकूण विक्री

Picture Credit: pinterest

जुलैमध्ये Classic 350 च्या 39,197 युनिट्स विकल्या गेल्या. मागील वर्षीच्या 26,516 युनिट्सच्या तुलनेत विक्रीत 47.82% वाढ झाली.

Classic 350 पुन्हा अव्वल

Picture Credit: pinterest

जुलै 2026 मध्ये Bullet 350 च्या 26,245 युनिट्स विकल्या गेल्या. गेल्या वर्षी ही संख्या 15,847 होती.

Bullet 350 ची मोठी झेप

Picture Credit: pinterest

जुलैमध्ये Hunter 350 च्या 22,031 युनिट्स विकल्या गेल्या. मागील वर्षीच्या तुलनेत विक्री 19.91% वाढली.

Hunter 350 चीही चांगली कामगिरी

Picture Credit: pinterest

जुलै 2026 मध्ये Meteor 350 च्या 11,152 युनिट्स विकल्या गेल्या. वार्षिक आधारावर 29.67% वाढ नोंदवली.

Meteor 350 ची विक्री

Picture Credit: pinterest

Classic, Bullet, Hunter आणि Meteor या चार बाइक्सनी मिळून जुलैमध्ये तब्बल 98,625 युनिट्सची विक्री केली.

350cc बाइक्सचा दबदबा

Picture Credit: pinterest

650 Twin च्या 2,223 युनिट्स आणि Super Meteor 650 च्या 805 युनिट्सची विक्री झाली. दोन्ही मॉडेल्सच्या विक्रीत वार्षिक घट झाली.

मोठ्या इंजिनच्या बाइक्सची विक्री

Picture Credit: pinterest

Guerrilla 450 च्या विक्रीत तब्बल 108.58% YoY वाढ झाली. Himalayanच्या विक्रीतही 40.87% वाढ नोंदवली.

Guerrilla 450 ने मात्र सर्वाधिक वाढ दाखवली!

Picture Credit: pinterest

जुलैच्या आकडेवारीवरून कंपनीच्या 350cc मोटरसायकल्सची मागणी अजूनही मजबूत असल्याचे दिसते.

निष्कर्ष

Picture Credit: pinterest