Royal Enfield Bullet 350 चं रिलॉन्चिंग,काय आहे खास ?

 Royal Enfield ने  नवीन Bullet 350 रिलॉन्च केली आहे.

Royal Enfield ची नव्याने लाँच झालेली मोटारसायकल हंटर 350 आणि क्लासिक 350 या मॉडेलमधली आहे.

कंपनीने बुलेट 350 आता 3 प्रकारात लॉन्च केली आहे.

बेस व्हेरिएंटची किंमत 1.73 लाख रुपयांपासून सुरू होते. मिड-लेव्हल व्हेरिएंटची किंमत 1.97 लाख रुपये आणि टॉप व्हेरिएंटची किंमत 2.15 लाख रुपये आहे.

मिलिटरी, स्टँडर्ड आणि ब्लॅक गोल्ड अशी तीन प्रकारांची नावे आहेत. 

यावेळी जुने इंजिन स्क्रॅप करुन नवीन रिफ्रेश इंजिन मिळू शकते. हे रिफ्रेश केलेले लाँग-स्ट्रोक इंजिन 20.2 बीएचपी पॉवर आणि 27 एनएम टॉर्क निर्माण करते.

बुलेट 350 ला नवीन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडले गेले आहे. यात सिंगल चॅनल एबीएस आहे. तसेच 135 मिमी ग्राउंड क्लिअरन्स मिळेल. 

नवीन बुलेट क्लासिक 350 पेक्षा 19,000 रुपये स्वस्त आहे. मात्र हंटर 350 पेक्षा 24,000 रुपयांनी महाग आहे. बाईकमध्ये सिंगल पीस सीट आणि 300 mm डिस्क ब्रेक आहे. आजपासून बुकिंगला सुरुवात झाली आहे.