30 एप्रिलला टेलिव्हिजनवरील 'अनुपमा' म्हणजेच रुपाली गांगुलीने बर्थ डे सेलिब्रेट केला.
सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या बर्थ डे पार्टीचे फोटो, व्हिडिओ व्हायरल झाले.
यातील एका व्हिडिओमध्ये रुपाली जल्लोषात नाचताना आणि गाताना दिसत आहे.
दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती YouTube इन्फ्लूएंसर रणवीर अलाहाबादियासोबत पोज देताना दिसतेय.
फोटोसाठी पोज देण्याआधी अभिनेत्रीने मनगटाने त्याचा चेहरा पुसताना दिसली.
टेलिव्हिजनच्या संस्कारी सुनेचं हे कृत्य पाहून यूजर्सनी ट्रोल करायला सुरुवात केली.
एका यूजरने लिहिले, 'कमी प्या'. दुसऱ्याने लिहिले की, 'जास्त प्यायल्यावर असे होते.'
अनुपमा मालिकेतील भूमिकेमुळे रुपाली गांगुलीला खूप प्रसिद्धी मिळालीय.