चहासोबत टोस्ट खाणं सगळ्यांनाच आवडते,यात वेलचीपासून अनेक फ्लेवर येतात.
काही जण दिवसातून 2 वेळा चहासोबत टोस्टच खातात.
मात्र, हा टोस्ट कसा बनवतात तुम्हाला माहितेय का? हे पाहा.
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर फूडी इनकार्नेट नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
टोस्ट तयार करताना काहीजण पीठ मळताना दिसत आहेत. स्वच्छतेचा तर दूरदूरवर संबंध नसल्याचं दिसत आहे.
यानंतर हे मिश्रण पुन्हा एकदा नीट मळण्यात येत आहे. गरजेनुसार पुन्हा तेल टाकण्यात येते.
नंतर त्याचे आकार कट करून एका प्लेटवर ठेवण्यात आल्याचं दिसतंय
या ब्रेडसारख्या दिसणाऱ्या पीठाचे आयताकृती टोस्ट बेक केले जातात.
हे टोस्ट रंग येण्यासाठी दोनवेळा बेक केले जातात.
सोशल मीडिया यूजर्स यावर मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.