RRR पासून मगधीरापर्यंत राजामौलींचे ‘हे’ चित्रपट लय भारी

दिग्दर्शक एस एस राजामौली यांचा आज 50 वा वाढदिवस आहे.  त्यानिमित्ताने त्यांचे IMDb वर सगळ्यात जास्त रेटिंग असलेले चित्रपट जाणून घेऊयात.

बाहुबली : द बिगिनिंग हा चित्रपट आजही लोकप्रिय आहे.

बाहुबली : द कन्क्ल्यूजन हा बाहुबली सिनेमाचा दुसरा भाग प्रचंड गाजला.

आरआरआर या चित्रपटाने जागतिक स्तरावर आपली एक ओळख निर्माण केली.

एगा या सिनेमात एका माशीची काल्पनिक गोष्ट आहे.

विक्रमारकुडू हा देखील राजामौलींचा गाजलेला ॲक्शन सिनेमा आहे.

मुघल काळ आणि मॉडर्न इंडिया असे दोन्ही काळ मगधीरा चित्रपटात बघायला मिळतात.

छत्रपती या सिनेमालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला.

मर्यादा रमण्णा हा एक सांगितिक विनोदी सिनेमा आहे.

 चॅलेंज आणि सिम्हाद्री या राजामौलींच्या चित्रपटांचंही नेहमी कौतुक केलं जातं.