सब्जाच्या बिया पाण्यात भिजवून खाल्ल्यास सर्वात जास्त पौष्टिक असतात.

सब्जा बियाणे अल्फा-लिनोलेनिक ऍसिडने (एएलए) समृद्ध आहेत. यामुळे फॅट बर्न होण्यास, चयापचय वाढवण्यास मदत करतात.

तुम्ही एक कप कोमट पाण्यात सुमारे दोन चमचे सब्जा भिजवून खाल्ल्याने फायदेशीर ठरते.

उष्णतेवर मात करण्यासाठी सब्जाच्या बियाण्यांचा उपयोग होतो.

सब्जाच्या बिया टाइप 2 मधुमेहासाठी चांगल्या मानल्या जातात कारण ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतात.

सब्जा बिया नैसर्गिकरित्या तुमचे शरीर डिटॉक्स करतात. 

सब्जाच्या बियांमध्ये अँटिस्पास्मोडिक गुणधर्म असतात, स्नायूंमधील तणाव कमी होतो.

सब्जाच्या बिया पोटाची जळजळ शांत करतात आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतात.

 सब्जाच्या बिया नारळाच्या तेलात ठेचून लावल्यास एक्जिमा आणि सोरायसिस सारख्या संसर्गावर उपचार करण्यास मदत होते.