तुम्हाला माहितेय साबुदाणा कसा तयार होतो?
साबुदाणा कारखान्यात तयार केला जातो.
कसावा नावाच्या मुळापासून तयार होतो. उसाप्रमाणे कसावाची लागवड केली जाते.
साबुदाणा हे बारामाही पीक आहे. 9 ते 11 महिन्यात साबुदाणा तयार होतो.
साबुदाण्याचं पीक घेण्यासाठी कमी पाणी, कमी देखभाल लागते.
पीक तयार झाल्यावर त्याची मूळं काढून कारखान्यात पाठवली जातात.
कारखान्यात माती,धूळ झटकून कंद सोलण्यात येतात.
कंद कुस्करून त्यातले धागे वेगळे केले जातात.
कंदांमधून पांढरा रस काढला जातो. या रसापासून पल्प तयार केला जातो.
या पल्पमधूनच पांढरे दाणे अर्थातच साबुदाणा तयार केला जातो.