नवरा माझा नवसाचा या सिनेमाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सचिन पिळगावकर यांनी नुकतीच 'नवरा माझा नवसाचा 2'ची रिलीज डेट जाहीर केली.
तब्बल 15 वर्षांनंतर आता सिनेमाचा सिक्वेल येणार आहे.
5 फेब्रुवारीला सिनेमाच्या सिक्वेलची घोषणा निर्माते, दिग्दर्शक सचिन पिळगावकरांनी केली.
नुकतच त्यांनी सिक्वेल सिनेमा कधी रिलीज होणार ते जाहीर केलं
यंदा सिनेमा रिलीज होणार असल्याचं सचिन यांनी सांगितलं.
सिनेमातील गाणी, डायलॉग आणि भूमिका खूप गाजल्या होत्या.
सध्या सोशल मीडियावर सिनेमातील डायलॉग्ज, गाण्यांचे रील्स व्हायरल होत आहेत.