सचिन तेंडुलकरच्या उपस्थितीत ‘800’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच

इंटरनॅशनल टेस्ट क्रिकेटमध्ये 800 विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. आता त्याच्या आयुष्यावर ‘800’ नावाचा सिनेमा येतोय.

या चित्रपटाचा ट्रेलर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या उपस्थितीत लाँच करण्यात आला.

मुंबईत हा कार्यक्रम संपन्न झाला.

सचिन तेंडुलकर, सनथ जयसुर्या आणि मुथय्या मुरलीधरन हे तिघेही क्रिकेटपटू यावेळी एकत्र दिसले.

अभिनेता मधुर मित्तल चित्रपटात मुरलीधरनची भूमिका साकारणार आहे.

सचिन तेंडुलकर म्हणाला की,“माझी आणि मुथय्या मुरलीधरन यांची पहिली भेट 1993 मध्ये झाली होती. तेव्हापासून आजपर्यंत आम्ही दोघे एकमेकांच्या संपर्कात आहोत.”

मुथय्या मुरलीधरनने ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये आल्याबद्दल सचिन तेंडुलकरचे आभार मानले.

एम.एस. श्रीपती यांनी ‘800’ या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे.

‘800’ हा चित्रपट 6 ऑक्टोबर 2023 रोजी रिलीज होणार आहे.