सचिन तेंडुलकरने काश्मीर ट्रिपचे फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

सचिनने पत्नी अंजलीसोबत काश्मीरमध्ये बर्फवृष्टीचा आनंद लुटला.

काश्मीरच्या गुलबी थंडीचा सचिन, अंजली आणि साराने मनसोक्त आनंद घेतला.

काश्मीरच्या सौंदर्याची भुरळ क्रिकेटच्या देवालाही पडलीच..

या फोटोंना सचिनने  "Love at frost sight" असं कॅप्शन दिलेलं आहे.

काश्मिरच्या या थंडीत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटल्याचंही पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये दिसतंय.

सचिन आणि अंजली चक्क लहान होऊन बर्फात खेळताना दिसत आहेत.

सचिनच्या या ट्रिपच्या सुंदर फोटोंवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केलेला आहे.