क्रिकेटचा देव अर्थातच सचिन तेंडुलकर आज त्याचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहे.
1989 मध्ये सचिन तेंडुलकरने पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडूलकरच्या नावावर आहे.
टेस्ट मॅचमध्ये त्याने 15,921 धावा केल्या आहेत. वन डेमध्ये 18,426 धावा केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके झळकवली आहेत.
कसोटीमध्ये 51 आणि वन डेमध्ये 49 शतकं झालेली आहेत.
वन डे क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त'मॅन ऑफ द मॅच'चा पुरस्कार जिंकलेला आहे. आतापर्यंत 62 वेळा तेंडुलकरला 'मॅन ऑफ द मॅच' देण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने 76 वेळा 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार पटकावला आहे.
सचिन तेंडुलकरने 2003 च्या विश्वचषकात 673 धावा केल्या होत्या.
हा विक्रम तोडणं एवढं सोप्प नाही.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध 20 शतके सचिन तेंडुलकरने केलेली आहेत. ही कोणत्याही टीमविरोधात फलंदाजाने झळकावलेली सर्वाधिक शतके आहेत