सचिन तेंडुलकरचं काशी विश्वनाथ दर्शन
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वाराणसीत क्रिकेट स्टेडियमचं उद्घाटन होणार आहे.
या उद्धाटनासाठी सचिन तेंडुलकरसह क्रिकेट क्षेत्रातील अनेक मंडळी वाराणसीत आली आहेत.
वाराणसीत आल्यानंतर सचिनने काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन घेतलं.
सचिन व्यतिरिक्त इंडियन क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे सचिव जय शाहदेखील काशी विश्वनाथ मंदिरामध्ये आले होते.
स्टेडियमच्या उद्धाटनाच्या कार्यक्रमासाठी 1983 चा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या इंडियन टीममधील सगळ्या क्रिकेटपटूंना आमंत्रण देण्यात आलं आहे..
भगवान शंकरांच्या थीमवर वाराणसीचं स्टेडियम बांधण्यात येणार आहे.
स्टेडियमच्या उद्धाटनासाठी आलेल्या सचिनने काशी विश्वनाथ मंदिरात पूजा केली.
त्याने मंदिरात अभिषेकही केला.