सचिन तेंडुलकर कुटुंबासोबत अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी भेट देतो.

सचिन पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात मुलगी सारा आणि पत्नी अंजलीसोबत शनिवारी पोहोचला.

यावेळी या तिघांनीही बॅट बनवणाऱ्या कारखान्याची पाहणी केली.

यावेळी सचिन, सारा आणि अंजलीने हातात बॅट धरल्याचं दिसत आहे.

पर्पल स्वेटर, ब्लू जीन्स आणि व्हाईट शूजमध्ये सारा खूपच छान दिसत होती.

तर ब्राऊन कलरच्या सनग्लासेसमध्ये सचिन स्टायलिश दिसत होता.

यावेळी सारा, सचिन आणि अंजलीने चाहत्यांसोबत अनेक फोटोही क्लिक केले.

याआधी सचिनने पत्नीसोबत आग्रा येथील ताजमहाललाही भेट दिल्याचं समजतं.