सईच्या घरी कुणीतरी येणार येणार गं...

Photo Credit- Sai.lokur/instagram

बिग बॉसमुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री सई लोकूर हिच्या घरी  लवकरच चिमुकल्या पाहूण्याचं आगमन होणार आहे.

सईनं सोशल मीडियावर तिचा नवरा तीर्थदीप रॉयसोबतचे खास फोटो शेअर करुन गुड न्यूज दिली आहे.

या फोटोमध्ये सईच्या हातात प्रेग्नन्सी टेस्ट किट दिसत आहे.

फोटोमध्ये सई पिंक अँड व्हाईट कफ्तान आणि हाय हेअर बन अशा लूकमध्ये दिसत आहे.

तीर्थदीप व्हाईट टीशर्ट आणि ग्रे पँट अशा लूकमध्ये दिसत आहे.

सई आणि तीर्थदीप यांच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.

सईने 2020 मध्ये तीर्थदीपसोबत लग्न केलं होतं.

त्यांच्या आयुष्यात चिमुकल्याचं आगमन होणार असल्याचा आनंद त्या दोघांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतोय.