मराठी फिल्म इंडस्ट्रीतली आघाडीची अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर.

फॅशनेबल, बोल्ड असलेली सई तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बिनधास्तपणे बोलते. 

सई आणि अमेयने घटस्फोट का घेतला याचं कारणही सईने काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

सई आणि अमेय गोसावीचं लग्न धुमधडाक्यात झालं होतं, मात्र आता तिचा घटस्फोट झालेला आहे. 

सई म्हणते, "अमेय खूप चांगला मुलगा आहे. आयुष्यात आलेल्या माणसांमध्ये सगळ्यात सुंदर मन अमेयचं आहे."

अमेयसाठी आपल्या मनात एक खास जागा कायम असेल असंही सईचं म्हणणं आहे.

 "मात्र, एखादी गोष्ट जमत नसेल तर एकमेकांना ओरबाडून जगण्यात काहीच अर्थ नाही"

"आयुष्य खेचत पुढे ढकलण्यात काहीच अर्थ नाही. प्रत्येकाला आनंदी राहण्याचा अधिकार आहे." हे सई आवर्जून सांगते

घटस्फोटाच्या कागदांवर सह्या केल्यानंतरही अमेय आणि सई एकत्र जेवायला गेले असल्याचंही सईने सांगितलं होतं.