‘दुनियादारी’ या संजय जाधव दिग्दर्शित मराठी चित्रपटाला 10 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने खास फोटोशूट करण्यात आलं.
या रेट्रो लूकमधल्या फोटोशूटचे फोटो सई ताम्हणकरने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
सुहास शिरवळकर यांच्या कादंबरीवर आधारित ‘दुनियादारी’ हा चित्रपट प्रचंड गाजला.
सईने या चित्रपटात शिरीन ही भूमिका साकारली होती.
हे फोटो पाहून अनेकांनी ‘दुनियादारी’ चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे का ? असं विचारलंय.
सईने हे फोटो शेअर करत ‘दुनियादारी’ला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ‘चला हवा येऊ द्या ’ कार्यक्रमात येणार असल्याचं सांगितलं.
आजही या चित्रपटातील गाणी, संवाद प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत.
‘चला हवा येऊ द्या’ शोच्या माध्यमातून चित्रपटाच्या आठवणी पुन्हा जाग्या होतील.
पण सध्या ‘दुनियादारी’च्या सगळ्या कलाकारांच्या रेट्रो लूकची चर्चा सुरु आहे.
रेट्रो लूकमधले सईसोबतचे कलाकारांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.