सलमान खान अनेकांचा आवडता अभिनेता आहे.

पण सलमान खानचं आवडतं एक ब्रेसलेट आहे त्याच्याविषयी तुम्हाला माहिती आहे का?

सलमान खान त्याच्या हातात कायम एक फिरोजा स्टोनचं ब्रेसलेट घालतो.

एका मुलाखतीत त्याने या ब्रेसलेटविषयी भाष्य केलं.

सलमान म्हणाला की,‘माझे बाबा पूर्वी ब्रेसलेट वापरायचे. त्यावेळी मी त्यांच्या ब्रेसलेटसोबत खेळायचो. मी मोठा झाल्यावर त्यांनी मला  ब्रेसलेट दिलं.

या ब्रेसलेटमध्ये निळ्या रंगाचा फिरोजा स्टोन आहे.

हा खडा नकारात्मक ऊर्जा त्याच्याकडे खेचून घेतो.

सलमान खानच्या या ब्रेसलेटमुळे ब्रेसलेटचा एक ट्रेंड सुरु झाला.

आजही या ब्रेसलेटची क्रेझ कायम आहे.