बिग बॉस 17 ला रविवारपासून दणक्यात सुरुवात झाली आहे.
या सीझनमध्ये अशा अनेक गोष्टी घडल्या ज्या यापूर्वी कधीही पाहिलेल्या नव्हत्या.
या सीझनमध्ये बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांसाठी एक नव्हे तर तीन घरे बांधण्यात आली आहेत. दिल.. दिमाग.. दम..
'दिल'थीमच्या घरात प्रेमाचा माहोल असेल. सर्वात हुशार स्पर्धक 'दिमाग'थीममध्ये. बिग बॉस प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करतील
'दम' थीममध्ये आत्मविश्वासाला महत्त्व आहे. इथले स्पर्धक स्वत: गोष्टी ठरवतील.
घर क्रमांक एकमध्ये एक फोन आहे. शोमध्ये स्पर्धकांना फोनची सुविधा देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
दिल थीममधील घरातल्यांना वैयक्तिक वॉशरुम, थेरपी सुविधा आहे.
दरवर्षी सलमान स्टेजवरून शो सुरू करायचा, पण पहिल्यांदाच होस्ट बिग बॉसच्या घरातून परफॉर्म करताना दिसला.
बिग बॉसमध्ये टीव्ही कपल, एक्स-कपल, क्राईम रिपोर्टर, वकील, स्टँडअप कॉमेडियन आणि यूट्यूबर्स हे पहिल्यांदाच एकत्र गेम खेळताना दिसणार आहेत.