समांथा रुथ प्रभूने सध्या तिच्या आजारपणामुळे अभिनयातून ब्रेक घेतला आहे.
ब्रेक घेतल्यानंतर समांथा बालीला फिरायला गेली आहे.
बाली ट्रिपचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
बाली हे इंडोनेशियामधलं एक बेट आहे.
समांथाने ‘Mornings Like These’ असं म्हणत बालीतले फोटो शेअर केले आहेत.
बालीमध्ये हॅट घालून अनुषा स्वामी या मैत्रिणीसोबत फिरताना काढलेले फोटो तिने शेअर केले आहेत.
निसर्गाच्या सानिध्यात समांथा रमलेली दिसतेय.
तिच्या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.
समांथा तिच्या मायोसायटिस या आजारातून लवकर बरी व्हावी, यासाठी अनेकजण प्रार्थना करतायत.