समंथा रुथ प्रभू नेहमीच हेल्दी खाण्याला प्राधान्य देते. चिया सीड पुडिंगची ही रेसिपी आहे, जी तुम्ही घरी करून पाहू शकता.
3 चमचे चिया सीड्स, 1 कप बदामाचे दूध, 1 टीस्पून मध, 2 अंजीर, 2 छोटी केळी, 5-6 मनुका, 2 चमचे पिस्ता, 2 चमचे डाळिंबाचे दाणे आणि 1 टीस्पून बदाम.
चिया सीड्स बदामाच्या दुधात 30-45 मिनिटे भिजवा. नंतर त्यात व्हॅनिला इसेन्स आणि मध घाला.
अंजीर आणि केळी चिरून बाजूला ठेवा. तसेच डाळिंबाचे दाणेही सोलून घ्या.
ही चिरलेली फळे एका बाऊलमध्ये घ्या.
या फळांवर चिया सीड्स आणि दुधाचे मिश्रण ओता.
चिरलेले बदाम, पिस्ता आणि मनुका घालून गार्निश करा.