‘या’ देशांमध्ये आहे समलैंगिक विवाहाला मान्यता
अमेरिकेत 2015 साली समलैंगिक विवाहाला मान्यता देण्यात आली.
तैवानमध्ये 2019 मध्ये समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यात आली. अशी मान्यता देणारा तैवान आशिया खंडातला पहिला देश ठरला.
मध्य अमेरिकेतील कोस्टारिकामध्ये 26 मे 2020 ला समलैंगिक विवाहाला परवानगी देण्यात आली.
दक्षिण आफ्रिकेने 30 नोव्हेंबर 2006 ला समलैंगिक विवाहाला मान्यता देण्याचा निर्णय घेतला.
ऑस्ट्रियामध्ये 2017 ला समलैंगिक विवाहाला मान्यता मिळाली.
नेदरलँड्समध्ये 2001ला, बेल्जियममध्ये 2003 या वर्षी, कॅनडामध्ये 2005 ला
आणि स्पेनमध्ये 2005 ला समलैंगिक विवाहाला मान्यता मिळाली.
नॉर्वे,स्वीडन, पोर्तुगाल,अर्जेंटिना,डेन्मार्क,उरुग्वे,न्यूझीलंड आणि फ्रान्स या देशातही समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता मिळाली आहे.
कोस्टा रिका, स्वित्झर्लंड,मेक्सिको, चिले,स्लोव्हेनिया आणि क्युबा या देशातही समलैंगिक विवाह मान्य करण्यात आले आहेत.