समंथा रुथ प्रभूने ॲक्टिंगमधून ब्रेक घेत ती आश्रमात पोहोचल्याचे फोटो व्हायरल होत आहेत.

पांढरा सूट घालून गळ्यात हार घालून समंथा मेडिटेशन करताना दिसत आहे. 

हे फोटो स्वत: समंथा प्रभूने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

फोटो शेअर करताना समंथाने कॅप्शन लिहिले की,'माझ्या मनात विचारांचे वादळ नव्हते, कोणतीही हालचाल न करता बसणे केवळ अशक्य वाटत होते.'

अभिनेत्रीने पुढे लिहिले, 'मेडिटेशन हा माझ्या शक्तीचा सर्वात शक्तिशाली स्त्रोत आहे."

"शांतता, कनेक्शन आणि स्पष्टतेसाठी खूप महत्त्वाची आहे. मेडिटेशन जितके साधे आहे तितकेच शक्तीशाली आहे."

समंथा वरुण धवनसोबत सिटाडेलच्या भारतीय व्हर्जनमध्ये दिसणार आहे.

समंथा सध्या myositis नावाच्या एका ऑटोइम्यून आजाराने त्रस्त आहे. 

समंथाने विजय देवरकोंडासोबत तिच्या 'कुशी' सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आहे.