सॅमसंग कंपनीने भारतात आपला अल्ट्रा लक्झरी मायक्रो LED टीव्ही लॉन्च केला आहे.याची किंमत गाडीपेक्षा जास्त आहे.

 हा मायक्रो एलईडी टीव्ही भारतातील निवडक रिटेल स्टोअर्स आणि सॅमसंगच्या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

हा भव्य टीव्ही 110 इंचाचा आहे. 

 सॅमसंगने लॉन्च केलेल्या या मायक्रो एलईडी टीव्हीची किंमत 1,14,99,000 रुपये आहे.

अल्ट्रा प्रीमियम डिस्प्ले हवा असणाऱ्या लोकांसाठी हा टीव्ही डिझाइन करण्यात आला आहे.

मायक्रो एलईडी टीव्ही लक्झरी इंटेरिअरमध्ये फिट होण्यासाठी तयार करण्यात आला आहे.

यात 24.8 दशलक्ष मायक्रोमीटर आकाराचे अल्ट्रा एलईडी वापरण्यात आले आहेत.

सॅमसंग टीव्हीमध्ये मोनोलिथ डिझाइनचा वापर करण्यात आला आहे. यामुळे तो अनेक प्रकारच्या होम डेकोरला सूट होऊ शकतो.

टीव्हीमध्ये अ‍ॅम्बियंट मोड+  असल्याने टीव्ही आर्ट डिस्प्ले वॉलमध्ये बदलू शकतो. तसेच या टीव्हीमध्ये AI अपस्केलिंग क्षमता आणि एरिना साउंडचे फिचरही आहे.

आलिशान जीवनशैलीला पूरक असा हा टीव्ही आहे.