सॅमसंग कंपनी लवकरत ‘Galaxy Ring’ नावाची आपली स्मार्ट रिंग लॉन्च करणार आहे.

या स्मार्ट रिंगमध्ये इन बिल्ट सेन्सर्स असतील जे तपशीलवार शरीराचा आणि आरोग्याचा डेटा संकलित करतील.

मेडिकल क्लिअरन्स मिळाल्याशिवाय सॅमसंग वेलनेस प्रोडक्ड म्हणून ही स्मार्ट रिंग लाँच करु शकत नाही.

या स्मार्ट रिंगच्या सेन्सर्समुळे ह्रदयाची गती, रक्तदाबासह अनेक हेल्थ ट्रॅक फिचर्स वापरता येणार आहेत.

ही स्मार्ट रिंग तुम्ही स्मार्टफोनशीही कनेक्ट  करू शकाल.

सॅमसंगच्या स्मार्टवॉचच्या तुलनेत स्मार्ट रिंग अधिक  अचूक माहिती देऊ शकेल. त्यामुळे ही रिंग स्मार्टवॉचची जागा घेऊ शकते.

सॅमसंगच्या गॅलॅक्सी रिंगला मेडिकल डिव्हाइस स्टेट्स सर्टिफिकेशन मिळण्यासाठी 10-12 महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असा अंदाज आहे.

कंपनीला रिंग बाजारात आणण्यापूर्वी काही तांत्रिक अडथळ्यांवर मात करणं आणि प्रक्रियेत नॅव्हीगेट करणं आवश्यक आहे.

Boat आणि Noise ने याआधीच स्मार्ट रिंग लाँच केल्या आहेत. Samsung च्या रिंगमध्ये वेगळं काय असणार याविषयी उत्सुकता आहे.